ओम गणेश मित्रमंडळ शिरवलतर्फे
विविध कार्यक्रमानी गणेश जयंती साजरी

⚡कणकवली ता.२७-: ओम गणेश मित्रमंडळ शिरवल आयोजित गणेश जयंती उत्सव गेली आठ वर्षे सातत्याने हे मंडळ गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. त्या निमित्ताने गणेश जयंती दिवशी सकाळी धार्मिक कार्यक्रम पार पाडले. त्यानंतर दुपारी महाप्रसाद, संध्याकाळी वारकरी संप्रदायाचा हरिपाठ , स्थानिक भजने हे कार्यक्रम पार पडले . रात्रौ 10 वा. राॅयल फुगडी ग्रुप ओवळीये यांचा लाईव्ह पारंपारिक बहारदार फुगडी नृत्य सादर केले. त्या नंतर रेकाॅर्ड डान्स स्पर्धा संपन्न झाली.

त्यामध्ये पूर्वा मेस्त्री महीने प्रथम क्रमांक व आर्या घाडिगावकर हिने द्वितीय क्रमांक पटकावला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास गोलतकर यांनी केले. 26 जानेवारी रोजी सकाळी धार्मिक कार्यक्रम दुपारी महाआरतीनंतर महाप्रसाद आणि सायंकाळी 4 वा. गणपती बाप्पांची भव्य विसर्जन मिरवणूक हे सर्व कार्यक्रम पार पडले. हे सर्व कार्यक्रम पार पाडण्यासाठी मित्र मंडळाच्या सचिन गुरव ,बाळकृष्ण वंजारे, कृष्णा शिरवलकर, पंढरी शिरवलकर, सखाराम गुरव, विजय शिरवलकर, बबन गुरव, कृष्णा घाडिगावकर, संतोष शिरवलकर, राजेंद्र गुरव, नाथा
शिरवलकर, सचिन शिरवलकर, पांडुरंग शिरवलकर, राजेश शिरवलकर, उत्तम गुरव, नितीन गांवकर , संजय शिरवलकर, दिनेश घाडिगावकर, प्रसाद शिरवलकर, अक्षय घाडिगावकर, महेश मेस्त्री, सोनू मेस्त्री, सुयोग मेस्त्री या कार्यकर्त्यांना अथक प्रयत्न केले.

You cannot copy content of this page