कुंभारमाठ येथील रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद

मालवण : (प्रतिनिधी)

माघी गणेश जयंती निमित्त कुंभारमाठ येथील सिद्धिविनायक पटांगणावर भाजयुमो तालुकाध्यक्ष मंदार लुडबे मित्रमंडळाच्या वतीने गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात ३० जणांनी रक्तदान केले.

वायरी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून कुंभारमाठ येथील शासकीय तंत्रनिकेतन नजिक सिद्धिविनायक पटांगणावर माघी गणेश जयंती उत्सव साजरा होत असून यानिमित्त गुरुवारी रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी मंदार लुडबे, माजी जि. प. सदस्या सौ. संजीवनी लुडबे, करिश्मा लुडबे, अरुणा खाजणवाडकर, आशा लोके, मनिषा गांवकर, पुनम लोके, निता लोके, संदीप लुडबे, राहुल नरे, अक्षय नरे, शैलेश लुडबे, भाई मांजरेकर, गौरव तळगांवकर, दाजी गोसावी, दिपु माडये, प्रसाद देऊलकर, ओमकार लुडबे, ऋतिक चव्हाण, समिर चव्हाण, जगदिश हडकर, किशोर चव्हाण, तनुजा चव्हाण, मंगल तळगांवकर, भाई चव्हाण, रवी चव्हाण, पप्पु लुडबे, मुन्ना लुडबे, विराज लुडबे, कांता लुडबे, संजय फणसेकर, आदित्य लुडबे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page