बेकायदा वाळू, खडी वाहतुकीवर प्रांताधिकाऱ्यांची कारवाई….

बांद्यात मुंबई-गोवा महामार्गावर रचला सापळा ; डंपर पुढील कारवाईसाठी सावंतवाडी तहसीलदारांच्या ताब्यात

* *💫बांदा दि.१२-:* कुडाळहुन गोव्यात बेकायदा वाळू व खडीची वाहतूक करताना तीन डंपरवर खुद्द सावंतवाडी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी बांद्यात मुंबई-गोवा महामार्गावर सापळा रचून कारवाई केली. डंपरवर कारवाई करून हे डंपर पुढील कारवाईसाठी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या ताब्यात देण्यात आलेत. या कारवाईत प्रत्येकी १ लाख ३० हजार याप्रमाणे ३ लाख ९० हजार रुपये दांडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई मुंबई-गोवा महामार्गावर बांदा शहरानजीक सायंकाळी उशिरा करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यात अवैधरित्या वाळू वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती प्रांताधिकारी खांडेकर यांना मिळाली होती. त्यानुसार आज सायंकाळी मुंबई-गोवा महामार्गावर बांदा शहरानजीक सापळा रचण्यात आला होता. मिळालेल्या माहितीच्या आधारे तिन्ही डंपरची तपासणी करण्यात आली. त्यावेळी बेकायदा वाळू व खडी वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले. तिन्ही डंपरच्या चालकांकडे विचारणा केली असता पासमध्ये खाडाखोड करण्यात आली होती. चालकांनी समर्पक उत्तर न दिल्याने तिन्ही डंपर ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी तहसीलदार म्हात्रे यांच्या ताब्यात देण्यात आलेत.

You cannot copy content of this page