⚡मालवण ता.२३-: धामापूर सड्यावरील देवस्थान श्री मोरेश्वर गणपती मंदिर येथे २५ जानेवारी रोजी माघी गणेश जयंती उत्सव होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ६ वाजता श्री मोरेश्वर अभिषेक, सकाळी १० वाजता श्री मोरेश्वर गणपती आरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद, दुपारी ३ वाजता महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम, दुपारी ४ वाजता स्थानिकांची भजने, सायंकाळी ६ वाजता मान्यवरांचे सत्कार, रात्री ७ वाजता हेळेकर दशावतार नाट्य मंडळ, सावंतवाडी- कारिवडे यांचे दशावतारी नाटक तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
धामापूर सडा येथील श्री मोरेश्वर गणपती मंदिरात २५ रोजी कार्यक्रम
