⚡मालवण ता२३-: शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मालवण येथील शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेत सोमवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध सामाजिक उपक्रमही या निमित्ताने राबविण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, उपशहर प्रमुख यशवंत गावकर, संमेश परब, युवासेना शहर प्रमुख मंदार ओरसकर, माजी नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, महेंद्र म्हाडगुत, बाबा सावंत, मनोज लुडबे, मनोज मोंडकर, वासुदेव गांवकर, नरेश हुले, उमेश मांजरेकर, प्रसाद आडवणकर, संजय साळकर, हरिश्चंद्र हुरणेकर, गिरीश कांबळी, चंदू खोबरेकर, सचिन गिरकर, दत्ता पोईपकर, महिला आघाडी तालुकाप्रमुख दीपा शिंदे व श्वेता सावंत, तालुका समन्वयक पूनम चव्हाण, शहर संघटक रश्मी परुळेकर, उपशहर प्रमुख नंदा सारंग, कुडाळ मालवण युवती सेना प्रमुख शिल्पा खोत, मालवण युवती सेना प्रमुख निनाक्षी मेथर, अंजना सामंत, माजी नगरसेविका नीना मुंबरकर, तृप्ती मयेकर, महिला शाखा प्रमुख साक्षी मयेकर, आर्या गावकर, शांती तोंडवळकर, मंदा जोशी यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी भाई गोवेकर यांनी विचार मांडत मालवणचे शिवसेनेशी वेगळे नाते होते, तसेच बाळासाहेबांचे मालवणवर आणि इथल्या कार्यकर्त्यांवर प्रेम होते असे सांगितले. आज काही जण स्वार्थासाठी शिवसेनेतून बाहेर पडले, मात्र येत्या निवडणुकांमध्ये त्यांचे डिपॉझिट आम्ही जप्त करू असेही गोवेकर म्हणाले. तसेच बाळासाहेब सेवान्यास उभारून त्याद्वारे सामाजिक कार्यक्रम राबविण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. तर हरी खोबरेकर यांनी पडत्या काळात सर्व शिवसैनिक एकत्र राहिले, शिवसैनिक हेच बाळासाहेबांनी आम्हाला दिलेले मोठे पद आहे असे सांगत शिवसेनेशी गद्दारी केलेल्याना तसेच भाजपला गाडल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाहीत, असा इशारा दिला. यावेळी मंदार ओरसकर, पूनम चव्हाण, शिल्पा खोत यांनीही विचार मांडले.
