एअरटेल मोबाईल टॉवर पाडल्याने ग्रामस्थांची गैरसोय;विद्युत पुरवठा खंडित

⚡कणकवली ता.२२-: कणकवली
शहरातील परबवाडी येथे एअरटेल कंपनीचा मोबाईल टॉवर आज पाडण्यात आला. मात्र, हा टॉवर विद्युत वाहिन्यांवर पडल्यामुळे या भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला. खंडित झालेले विद्युत पुरवठा त्वरित सुरळित करावा यासाठी नागरिक आक्रमक झाले होते.
कणकवली परबवाडील एअरटेल कंपनीच्या मोबाईल टॉवर पाडण्यात आला. हा टॉवर विद्युत वाहिन्यांवर पडल्यामुळे या भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला. विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय झाली. परिणामी ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी खंडित झालेला विद्युत पुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. घटनास्थळी युवा सेनेचे तालुका समन्यवयक तेजस राणे, नगरसेवक बाबु गायकवाड, संजय कामतेकर, शेखर राणे, सिद्धेश नाईक,
शरद शिरवलकर, वायरमन विजय साटम हे दाखल झाले होते.

You cannot copy content of this page