कणकवली तालुका प्रवासी संघातर्फे 28 रोजी राष्ट्रीय प्रवासी दिन

⚡कणकवली ता.२२-: कणकवली तालुका प्रवासी संघातर्फे शनिवार २८ जानेवारीला सकाळी १० वा. कणकवली नगरवाचनालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात राष्ट्रीय प्रवासी दिन साजरा करण्यात येणार आहे. कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे असणार आहेत. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, डॉ. संदीप साळुंखे, पोलीस निरीक्षक अनिल जाधव, ॲड. दीपक अंधारी, भालचंद्र मराठे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कातकरी समाजासाठी काम करणारे उदय आईर, कोरोना काळात सेवा केल्याबद्दल डॉ. नीलेश कोदे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी अमोल भोगले, अक्षरसंग्राहक तथा पत्रकार निकेत पावसकर, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त स्नेहल राणे, रिक्षाचालक संतोष सावंत, २५ वर्षे विनाअपघात सेवा देणारे रा. प. चे कर्मचारी अजित राणे, वाहतूक पोलीस विनोद चव्हाण, कवी व साहित्यिक अरुण इंगळे यांचा गौरव करण्यात येणार असून कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष भाई खोत यांना कणकवली भूषण जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन तालुका प्रवासी संघाचे उपाध्यक्ष रमेश जोगळे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page