युवसेनेच्या पदाधिकाऱ्या स झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर मालवण तालुका समन्वयक मंदार ओरोसकर यांचा इशारा
मालवण दि प्रतिनिधी
कुंभारमाठ ग्रामपंचायत सदस्य व युवासेना पदाधिकारी राहुल परब याना उपसरपंचाकडून झालेल्या धक्काबुक्कीचा युवासेना मालवणने निषेध करतानाच एखादया जबाबदार लोकप्रतिनिधीने जनहिताच्या कामाची चौकशी करताना केलेली धक्का- बुक्की, कितपत योग्य आहे ? यापुढे जनहिताच्या कामाच्या आड कोणी येत असेल तर त्याला युवासेना जशास तसे उत्तर देईल, असा इशारा युवासेना मालवण तालुका समन्वयक मंदार ओरसकर यांनी दिला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री मंदार ओरोसकर यांनी म्हटले आहे की,
महाविकास आघाडीच्या काळात मंजूर होऊन कामाचे आदेश मिळालेल्या अपूर्ण रस्ता कामाबद्दल ठिकठिकाणी युवासेनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. याचमुळे तालुक्यातील महत्त्वाच्या अपूर्ण असलेल्या रस्त्यांची कामे सुरु झाली. त्यामुळे लोकांना होणारा त्रास थांबणार आहे. ही कामे दर्जेदार होईपर्यंत युवासेना शांत राहणार नाही. विकासाची कामे करता येत नसतील तर निदान विकास काम करताना अडथळा आणणे तरी बंद करावे. यापुढील काळातही युवासेना लोकहिताची कामे करण्यासाठी कायमच पुढे राहिल. सदर रस्ता काम ग्रामपंचायत सदस्य राहुल परब याने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याने चालु झाले. हे लक्षात आल्याने उपसरपंचानी रागाने धक्का बुक्की केली असावी, असे मंदार ओरोसकर यांनी यांनी म्हटले आहे.
