कणकवली व सावंतवाडी केंद्रावर पार पडली परीक्षा
⚡कणकवली ता.२२-:
परमहंस भालचंद्र महाराज संस्थानाच्या शैक्षणिक मंडळातर्फे रविवारी कणकवली
व सावंतवाडी केंद्रावर जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेण्यात आली. ८३१ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.
कणकवली केंद्रावरील या स्पर्धेचे उद्घाटन पुणे येथील सद्गुरु माऊली महाराज व भालचंद्र महाराज संस्थानाचे अध्यक्ष सुरेश कामत यांच्या हस्ते झाले. यावेळी
शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, संस्थानाचे विश्वस्त मुरलीधर नाईक, कणकवली कॉलेज प्राचार्य डॉ. राजेंद्र चौगुले, पुण्यातील उद्योजक सोमनाथ खेडेकर, प्राध्यापक दिवाकर मुरकर, संस्थानाचे व्यवस्थापक विजय केळुसकर, शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष गजानन उपरकर, सचिव काशीनाथ
कसालकर, शिक्षक श्रीकृष्ण कांबळी, विष्णू सुतार, मंगेश तेली, सदानंद गावकर,
शरद हिंदळेकर आदी उपस्थित होते.
सावंतवाडी केंद्रावरील सराव परीक्षेच्या उद्घाटन प.पू.भालचंद्र महाराज संस्थानाचे खजिनदार दादा नार्वेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थानाचे विश्वस्त प्रसाद अंधारी, सिद्धेश कुलकर्णी, प्रकाश परब, सुहास आरोलकर, किरण कोरगावकर, मधुकर पाटील, रावजी परब, श्री. राऊळ
उपस्थित होते. दरम्यान, सोहम साळगावकर या दिव्यांग विद्यार्थ्याने सावंतवाडी
केंद्रावर ही सराव परीक्षा दिली. सोहम या कृतीतून परीक्षेचे मोल किती असते हे दिसून आले. परीक्षा देणाऱ्या सोहमला गैरसोय होऊ नये म्हणून आयोजकांनी
त्याच्या बैठकीसाठी विशेष सोय केली होती.
