⚡कणकवली ता.२२-: टायगर ग्रुप सिंधुदुर्ग यांच्यावतीने वेताळबांबर्डे येथील अनाथ आश्रमातील मुलांना शैक्षणिक वस्तू देण्यात आल्या.
यावेळी टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत कडुलकर, उपाध्यक्ष हर्षद बेळेकर, जिल्हा संघटक प्रयाग कांबळे, संदीप कांबळे, प्रथमेश भाते, सर्वेश पावसकर, नयन माणगावकर, बंटी पाटकर, राहुल शिरसाट, पुंडलिक कांबळे, संजय कांबळे, गौरेश परब, निखील गाड, दिवाकर बांबर्डेकर आदी उपस्थित होते. टायगर ग्रुप सदस्यांनी वेताळबांबर्डेतील अनाथ आश्रमाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी आश्रमातील मुलांना बरोबर तीन तास वेळ घालवत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. आश्रमातील मुलांना संगणक प्रशिक्षण व आरोग्य सेवा देण्याची ग्वाही त्यांनी दिली. टायगर ग्रुपचे पदाधिकारी व सदस्य सामाजिक बांधलिकी जोपासून अनेक सामाजिक संस्थांना मदतीचा हात देत आहेत.
