⚡कणकवली ता.२१-: युवक कल्याण संघ संचलित विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयामध्ये प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष बी फार्मसी तसेच प्रथम वर्ष डी. फार्मसी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे खजिनदार मंदार सावंत आणि कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. राजेश जगताप यांच्या हस्ते झाले. प्रथम सरस्वती प्रतिमा पूजन व मान्यवराचे स्वागत करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश जगताप यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली तसेच फार्मसी नंतरच्या वेगवेगळ्या संधी बद्दल माहिती दिली. संस्थेचे खजिनदार मंदार सावंत यांनी विद्यार्थ्यांना कॉलेजमधील असलेल्या वेगवेगळ्या सुविधांचा वापर करून सर्वांगीण विकास करण्यास प्रोत्साहन दिले. या क्रार्यक्रमामध्ये विविध विभाग प्रमुखांनी आपआपल्या विभागाची माहिती दिली. तसेच महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष, आम.वैभव नाईक, उपाध्यक्षा. सौ. स्नेहा नाईक, सचिव डॉ. रमण बाणे, खजिनदार मंदार सावंत, प्राचार्य डॉ. राजेश जगताप, डी. फार्मसी विभाग प्रमुख प्रा. चंद्रशेखर बाबर, बी. फार्मसी विभाग प्रमुख प्रा. अमर कुलकर्णी व सर्व शिक्षकवृंद यांनी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा. समृद्धी पिसे व आभार प्रदर्शन प्रा. सचिन गोरड यांनी केले.
