शिवसेना नेते संदेश पारकर यांना विश्वास
देवगड(प्रतिनिधी)
देवगड तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांची देवगड अर्बन बँक ही बँक तोट्यात गेली व ती तोट्यात गेलेली बँक पुन्हा ऊर्जितावस्थेत आणणे यासाठी देवगड तालुक्यातील सभासदांनी या बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत परिवर्तन करण्याचे निश्चित केले आहे.गेली २२ वर्ष सत्ता उपभोगणाऱ्या संचालकांच्या विरोधात जनतेचा कौल असल्याने शिवसेना आणि काँग्रेस आघाडीच्या वतीने सहकार समृद्धी पॅनलच्या माध्यमातून देवगड अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेची पंचवार्षिक निवडणूक लढवली जात आहे मागील २२ वर्षातील कारभार म्हणजे ही बँक २७ लाख रुपये तोट्यात असून या बँकेची संचालकांच्या हितसंबंधांमुळे आर्थिक प्रगती होऊ शकली नाही. त्यामुळे सभासदांनी या निवडणुकीत परिवर्तनाची भूमिका घेतली आहे. व या निवडणुकीत परिवर्तन हे अटळ असून देवगड अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत सहकार समृद्धी पॅनल बहुमताने विजयी होईल असे आत्मविश्वास शिवसेना नेते संदेश पारकर यांनी देवगड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केला. यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख, नगराध्यक्ष साक्षी प्रभू देवगड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष उमेश कुळकर्णी,जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक, शिवसेना तालुकाप्रमुख मिलिंद साटम,उपतालुकाप्रमुख निवृत्ती तारी व देवगड अर्बन बँक सहकार समृद्धीचे पॅनलचे उमेदवार उपस्थित होते. त्यापुढे बोलताना संदेश पारकर म्हणाले ,कर्जदार आणि संचालकांचे हितसंबंध असल्यामुळे या बँकेची प्रगती न होता ही बँक तोट्यात गेलेली आहे. मतदानाचा हक्क मतदार बजावत असताना ही बँक परिवर्तन करून शिवसेना व काँग्रेस च्या सहकार समृद्धी पॅनलची ताब्यात द्यावी. असे आवाहन करून सर्वसामान्य कर्जदार शेतकरी मच्छीमार यांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी सहकार समृद्धी पॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे सांगून एक वर्षापूर्वी पार पडलेल्या देवगड जामसांडे नगरपंचायत मध्ये या भागातील नागरिकांनी सत्ता परिवर्तन करून नवीन चेहऱ्याने संधी दिली व शिवसेना राष्ट्रवादी आघाडीची सत्ता या नगरपंचायतीमध्ये स्थापन झाली. नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात जनतेला अपेक्षित असलेला विकास केला असून जनतेने दिलेले प्रेम व आशीर्वाद या जोरावर देवगड नगरपंचायतीची सर्व नगरसेवक हे जनतेची प्रामाणिक सेवा करीत आहेत. अशा पद्धतीचेच प्रेम देखील देवगड अर्बन बँक निवडणुकीत येथील मतदारांनी द्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले. संपूर्ण राज्यात महाविकास आघाडी असताना देवगड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपासोबत साथ देत आहे या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधामध्ये गेली वर्षभर आंदोलने चालू असून येथील स्थानिक आमदारांनी भाजपा आमदारांनी विरोध केला त्यांच्या पुतळ्यांचे दहन केलं व पुतळा समुद्रात फेकला तरी देखील येथील स्थानिक राष्ट्रवादीचे नेते हे भाजपशी युती करत आहेत. असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना या निवडणुकीत येथील मतदार या जागा दाखवून देतील.असे सांगून विकासात्मक काम करण्याकरता चांगले सुशासन देण्याचा प्रयत्न निश्चितपणे होईलच याबरोबरच व्यापारी मच्छीमार व सामान्य नागरिक यांचे हित जोपासले जाईल ही निवडणूक बिनविरोध व्हावी भूमिका असतानाही सन्मान जनक तोडगा सत्ताधारी संचालकांकडून न झाल्याने ही निवडणूक या संचालक मंडळाने सभासदांवर लादली आहे असा आरोपही त्यांनी केला .चांगली बँक तोट्यात गेली असून परिवर्तनासाठी आपण ही निवडणूक सहकार समिती पॅनलच्या माध्यमातून लढवीत आहोत या निवडणुकीत सहकार समृद्धी आणि निश्चितपणे विजय होणे असून पुढील पाच वर्षात या बँकेतला निश्चितपणे उर्जित अवस्था येईल असे आत्मविश्वासी संदेश पारकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
