जामसंडे सन्मित्र मंडळाचे आयोजन
देवगड (प्रतिनिधी)
जामसंडे सन्मित्र मंडळ, जामसंडेच्या वतीने गेली १३ वर्षे भव्य स्वरूपात निमंत्रित राज्यस्तरीय पुरुष व महिला खुला गट व जिल्हास्तरीय पुरुष खुलागट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करीत आहे. गेली २ वर्षे कबड्डी स्पर्धे बरोबर जिल्हास्तरीय कुस्ती, कॅरम, बुद्धीबळ व डॉजबॉल स्पर्धेचे आयोजन करणेत आले होते. यावर्षी मंडळाने दि. ६ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत क्रिडा महोत्सव आयोजीत केला आहे. यामध्ये राज्यस्तरीय पुरुष (निमंत्रीत खुलागट कबड्डी स्पर्धा जिल्हास्तर पुरुष व महिला निमंत्रीत खुलागट कबड्डी स्पर्धा जिल्हास्तर कुस्ती, जिल्हास्तर कॅरम व जिल्हास्तर हॉलीबॉल स्पर्धा या खेळांचा समावेश आहे यामध्ये राज्यस्तरीय पुरुष निमंत्रीत खुलागट कबड्डी स्पर्धा जिल्हास्तर पुरुष व महिला निमंत्रीत
खुलागट कबड्डी स्पर्धा जिल्हास्तर कुस्ती या स्पर्धा दि. ६ ते ८फेब्रुवारी २०२३ या कालावधीत पार पडतील तर जिल्हास्तर हॉलीबॉल स्पर्धा दि. १० फेब्रुवारी 2023 रोजी तर जिल्हास्तर कॅरम स्पर्धा दि. ११ फेब्रुवारी २०२३ रोजी पार पडेल. कॅरम स्पर्धा वगळता इतर सर्व स्पर्धा ह्या दिवस-रात्र होणार आहेत. स्पर्धा आयोजनासाठी मंडळा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन व देवगड तालुका कबड्डी असोसिएशन सिंधुदुर्ग जिल्हा कुस्ती असोसिएशन, सिंधुदुर्ग जिल्हाकॅरम असोसिएशन व सिंधुदुर्ग जिल्हा हॉलीवॉल असोसिएशन यांचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे. मंडळाने गेली १३ वर्षे स्थानिक गट, व्यावसाईक गट व महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी चषक (शिवशाही), कुमार गट अशा विविध पातळीवरील कबड्डी स्पर्धांचे उत्कृष्ट आयोजन केले आहे. यासाठी मंडळाला महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचा उत्कृष्ठ स्पर्धा आयोजनाचा पुरस्कारही मिळाला आहे. कबड्डी स्पर्धा दिवस-रात्र प्रकाश झोतात होणार असून यासाठी ४ मैदाने करणेत येणार आहेत. तसेच प्रेक्षक गॅलरी, मान्यवर गॅलरी, नवे व्यासपिठ उभारणेत येणार तसेच कुस्ती व हॉलीबॉल या स्पर्धा देखील दिवस रात्र होणार आहेत. खेळाडू पंच यांची भोजन व निवास व्यवस्था मंडळामार्फत करणेत येणार सदर कबड्डी कुस्ती या स्पर्धा विद्या विकास मंडळाच्या कै. इंदिराबाई ठाकुर कीडा नगरीत होणार आहे. तर कॅरम स्पर्धा ही कै. सरस्वती नलावडे सभागृह, जामसंडे हायस्कूल मध्ये होणार आहे तर हॉलीबॉल स्पर्धा श्री. मो. गोगटे हायस्कूलच्या पटांगणावर पार पडणार आहे. या क्रीडा महोत्सवासाठी आमदार नितेशजी राणे विधानपरिषद विरोधीपक्षनेते आमदार प्रविण दरेकर, आमदार विजय तथा भाई गिरकर, आमदार निरंजनजी डावखरे, आमदार प्रसाद लाड यांचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे.
क्रीडा स्पर्धाचे निटनिटके आयोजन होण्यासाठी स्पर्धा आयोजन समिती स्थापन केली असून त्यात निधी समिती कार्यालय समिती, भोजन समिती निवास समिती मैदान समिती पंच व्यवस्था समिती, मान्यवर बैठक व्यवस्था समिती, आरोग्य समिती, स्वच्छता समिती, स्वागत समिती, महिला खेळाडू व्यवस्था समिती, वहातूक समिती, पाणी समिती डेकोरेशन समिती, हिशेब समिती अशा उपसमित्या स्थापन केल्या असून प्रत्येक स्पर्धेला स्पर्धा प्रमुखाची नियुक्ती केली आहे.
