क्षितीजापलीकडे जाण्याचे सामर्थ्य शाळेत शिकवले जाते

शामराव देसाई;कोलझर प्रशालेचा शालेय क्रीडा पारितोषिक वितरण संपन्न

⚡बांदा ता.२१-: क्षितीजा पलीकडे जाण्याचे सामर्थ्य विद्यार्थ्यांना शाळेतून शिकविले जाते. शिक्षणा बरोबरच शारिरीक तंदुरुस्ती राखण्यासाठी क्रीडा क्षेत्रालाही तितकेच महत्व आहे, असे प्रतिपादन कोलझर देवस्थान समिती अध्यक्ष शामराव देसाई यांनी कोलझर येथे बोलताना केले.

         कोलझर येथील समाजसेवा हायस्कूलचा शालेय क्रीडा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. यावेळी अध्यक्षस्थानावरून देसाई बोलत होते. व्यासपीठावर समन्वय समिती सदस्य सुभाष बोंद्रे, मनोजकुमार देसाई, अमर सावंत, सौ. मानसी देसाई, पी. बी. राणे, मुख्याध्यापक एस. डी. राठोड उपस्थित होते.
     कोलझर प्रशालेचा क्रीडा महोत्सव २ व ३ डिसेंबर रोजी संपन्न झाला. यावेळी वैयक्तिक मैदानी स्पर्धा व सांघिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना प्रशालेकडून प्रमाणपत्र देण्यात आली. तसेच मनोजकुमार देसाई यांनी वडील कै. साजुराम देसाई यांच्या स्मरणार्थ पदके पुरस्कृत केली होती. यावेळी व्हिक्टोरी स्टँड उभारण्यात आल्याने स्पर्धकांना उच्च दर्जाच्या पारितोषिक वितरणाचा आनंद मिळाला.
       यावेळी सुभाष बोंद्रे व मुख्याध्यापक एस. डी. राठोड यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा शिक्षक सुनील परब यांनी केले. सुत्रसंचलन सहाय्यक शिक्षक सागर पांगुळ यांनी तर आभार सागर डेगवेकर यांनी मानले.

You cannot copy content of this page