पावणादेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ बावशीतर्फे विविध कार्यक्रम

⚡कणकवली ता.२१-: श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर मौजे बावशी गावठण यांच्या वतीने भव्य वास्तूची प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण ,लोकार्पण व दर्शन सोहळा रविवार दिनांक 22 जानेवारी ते गुरुवार दिनांक 26 जानेवारी 2023 या कालावधीत आयोजित केलेला आहे. यानिमित्त या कालावधीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे .


कार्यक्रम पुढील प्रमाणे 22 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता तोंडवली दत्त मंदिर ते बावशी गणेश मूर्ती आणि कलश मिरवणूक, सायंकाळी 7 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम 23 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता धार्मिक विधी, महाप्रसाद. दुपारी 3 वाजता हळदीकुंकू समारंभ ,सायंकाळी 7 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम ,मंदिर प्रदक्षिणा रात्री 9 वाजता भजन 24 जानेवारी सकाळी 8 वाजता होमहवन दुपारी 1 ते 3 वाजता महाप्रसाद सायंकाळी 6 वाजता आरती आणि मंदिर प्रदक्षिणा रात्री 9 वाजता तिरंगी भजनांचा जंगी सामना बुवा श्री विनोद चव्हाण विरुद्ध बुवा गुंडू सावंत विरूद्ध बुवा संदीप लोके , 25 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता ओमहवन, मूर्ती स्थापना दुपारी 1 ते 3 महाप्रसाद सायंकाळी 6.30 वाजता आरती आणि मंदिर प्रदक्षिणा रात्री 10 वाजता महान पौराणिक दशावतार नाटक, 26 जानेवारी कार्यक्रमाची सांगता आणि ब्राह्मण भोजन. तरी सर्व भाविकांनी सहकुटुंब मित्र मंडळ उपस्थित राहावे असे आवाहन पावना देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पावशी गावठाण यांनी केले आहे.

You cannot copy content of this page