*पुढील काळात मनसेच्या कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावा

संदीप दळवी;कोंडुरा येथे सावंतवाडी तालुक्यातील मनसे कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न*

⚡सावंतवाडी ता.२०सहदेव राऊळ : गाव तेथे मनसे शाखा या अभियाना अंतर्गत पुढील काळात मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येवून पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करावे, असे आवाहन मनसेचे राज्य सरचिटणीस संदीप दळवी यांनी केले.

कोंडुरा येथे मनसेच्या सावंतवाडी विधानसभा मतदासंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मनसेचे कामगार सेना राज्य सरचिटणीस गजानन राणे, महिला राज्य उपाध्यक्ष अनिषा माजगावकर, राज्य उपाध्यक्ष योगेश सावंत, विद्यार्थीसेना संपर्क अध्यक्ष अमोल साळुंखे, माजी जिल्हाध्यक्ष धीरज परब. माजी उपजिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, महेश परब, सुधीर राऊळ, राजू कासकर, आशिष सुभेदार, अमित नाईक. सुनिल गवस, सनी बागकर, गुरुदास गवंडे, काशिराम गावडे, अतुल केसरकर, राकेश परब, अजित पोळजी, अक्षय पार्सेकर, आदेश सावंत, मिलिंद सावंत, मंदार नाईक, साईल तळकटकर, संदीप राऊळ, सचिन पांगम, केतन सावंत व अन्य पदाधिकरी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रत्येक गावात मनसेच्या झेंड्याखाली काम करण्यासाठी तयार असलेला तरुण वर्ग निर्माण करा त्यासाठी आवश्यक असलेले सर्व सहकार्य पक्षाच्या माध्यमातून तुम्हाला दिले जाईल अशी ग्वाही यावेळी व्यासपीठावर असलेल्या मान्यवरांनी दिली. यावेळी मनसे पक्षाच्या माध्यमातुन जे ग्रामंपचायत निवडणुकीत निवडून आलेले व पराभुत मनसे सदस्य सरपंचाचा करण्यात सत्कार आला. अनेक तरुणांनी यावेळी मनसेत जाहीर प्रवेश केला. स्वागत संदीप दळवी यांच्या हस्ते करण्यात आले.

You cannot copy content of this page