⚡बांदा ता.१९-: डिंगणे येथील श्री देवी माऊली पंचायतनातील परिवार देवतांचा तत्वोत्तारण विधीचे आयोजन रविवार २२ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. त्यानिमित्त मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम होतील.
सकाळी ९ वाजता देवता प्रार्थना, प्रायश्चित्त विधी, यजमानांची शरीरशुध्दी, गणपती पूजन, पुण्याहवाचन, आचार्यवरण, प्राकारस्थलशुद्धी, मुख्य देवता स्थापन, परिवार देवतांचे पुजांग तत्वोत्तारण विधी, अग्नीस्थापन, वास्तुदेवता, ब्रम्हादीमंडळ देवता नवग्रह, मुख्य देवतांचे हवन, तत्वहोम, बलिदान, पुर्णाहुती, अभिषेक, आरती, देवता प्रार्थना आशिर्वाद हे कार्यक्रम होतील.
डिंगणेत रविवारी तत्वोत्तारण विधी सोहळा
