स का पाटील महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न

मालवण दि प्रतिनिधी

मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयामध्ये एनसीसी विभागाच्या वतीने एनडीआरएफचे जवान यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण पार पडले. यावेळी एनडीआरएफच्या टीमने विद्यार्थ्यांना विविध आपत्तीमध्ये करावयाच्या उपाययोजना यांचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले.

या प्रशिक्षणाच्यावेळी मालवणचे नायब तहसीलदार गंगाराम कोकरे,कॉलेजचे प्राचार्य एस. ए. ठाकूर, एनसीसी विभाग प्रमुख एम. आर. खोत तलाठी व्ही. एम. ठाकूर, उमेश काळे एनडी आर एफ चे प्रमोद कुमार, धर्मेंद्र सेवादा, बीबीशन मोरे, उमेश कुमार, संतोष जाधव, हरली अदाम, संदिप धेंडे, कैलाश कोकाटे, सचिन मोरे, भगवान नागठाणे, योगेश थोरात, रवींद्र पवार व इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होता. हे उपस्थित होते

यावेळी पूर परिस्थिती, वादळ, सुनामी, एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला असेल तर त्यावेळी प्रसंगावधान बाळगून काय केले पाहिजे तसेच इतर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी काय केले पाहिजे याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले.

यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी ओंकार यादव याने आभार मानले.

You cannot copy content of this page