दांडी येथील रक्तदान शिबिरात ५० जणांनी केले रक्तदान

⚡मालवण ता.१८-: मालवण दांडी येथे संपन्न झालेल्या श्री देव दांडेश्वर जत्रेचे औचित्य साधून दांडी (मालवण) आणि सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान मालवणच्या वतीने आज सकाळी दांडेश्वर मंदिरात संपन्न झालेल्या रक्तदान शिबीरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून ५० जणांनी रक्तदान केले.

या शिबिरात सौ. शीतल रोगे व नूतन रोगे या दाम्पत्याने रक्तदान करून आदर्श निर्माण केला. या शिबिरास आम. वैभव नाईक यांनी सदिच्छा भेट दिली. तर काही दिवसांपूर्वी निधन झालेल्या आणि रक्तदान चळवळीत भरीव योगदान देणाऱ्या स्व. आतू फर्नांडिस यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच मच्छीमार लढ्यात पत्रकारितेतून योगदान दिल्याबद्दल पत्रकार संदीप बोडवे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवसेना ठाकरे गट तालुकाप्रमुख हरी खोबरेकर ,सन्मेश परब, अन्वय प्रभू ,राका रोगे, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या मालवण तालुकाध्यक्ष सौ. शिल्पा खोत, निलेश कांदळगावकर, जगदीश खराडे, जीवन भगत, हेमंत जोशी, अन्वेषा आचरेकर, मृणाली कोयंडे, रुपेश प्रभू, महेंद्र पराडकर,भार्गव खराडे, अक्षय रेवंडकर, कौस्तुभ मालंडकर, कौशल पराडकर, भाई जाधव, डॉ. शिल्पा झांटये, साक्षी मयेकर शांती तोंडवळकर, सायली कांबळी, स्वाती तांडेल, सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान जिल्हा सचिव किशोर नाचणोलकर, डॉ. सिमिली, स्टाफ नर्स परब, रक्त पेढी तंत्रज्ञ पाटील व मयुरी शिंदे, नंदकुमार आडकर, नितीन गावकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page