शेतकरी संघटना अध्यक्ष अण्णा केसरकर यांची मागणी
⚡सावंतवाडी ता.१८-: जागेच्या वादाच्या भवऱ्यात वेळे न घालवता या ठिकाणी मल्टीस्पेशालिटी नको तर सिव्हिल हॉस्पिटलचा विचार करण्यात यावा अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा केसरकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना सादर केले आहे.
सावंतवाडी शहरात हॉस्पिटलच्या ठिकाणी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात बाबत गेल्या चार वर्षापासून हालचाली सुरू आहेत मात्र ही जागा न्यायप्रविष्ठ असल्याने या ठिकाणी अद्यापही हॉस्पिटल उभे राहू शकले नाही एकूणच अलीकडे या संदर्भात अण्णा केसरकर यांनी आंदोलनाची भूमिका हाती घेतली होती यानंतर संबंधित जागेत न्यायालयीन वात असल्याने येथे हॉस्पिटल उभेच राहू शकत नाही असा खुलासा शल्यचिकित्सकांनी केला होता तसेच आंदोलन मागे घेण्याची मागणी ही केली होती एकूणच त्यानंतर आता सावंतवाडी शहरांमध्ये जिल्हा रुग्णालय आणण्याची घोषणा अलीकडेच दीपक केसरकर यांनी केली त्याच धर्तीवर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री केसरकर यांनी शिल्लक शिक्षकांना निवेदन देत या ठिकाणी मल्टीस्पेशालिटी नको तर सिव्हिल हॉस्पिटल उभारा असे मागणी केली आहे.
