Headlines

कसाल बालमवाडी शाळेत सुरक्षित व असुरक्षित स्पर्श मार्गदर्शन

कायदेविषयक सुद्धा करण्यात आले सखोल मार्गदर्शन

बांदा/प्रतिनिधी
कोकण कला व शिक्षण विकास संस्था, केंद्रीय समाज कल्याण बोर्ड अनुदानित महिला मंडळ कुडाळ संचलित कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन केंद्र कुडाळ व महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद- सिंधुदुर्ग अनुदानित व महिला मंडळ कुडाळ संचलित महिला समुपदेशन केंद्र, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने कसाल-बालमवाडी येथे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेत मुलांसाठी सुरक्षित स्पर्श व असुरक्षित स्पर्श तसेच कायदेविषयक सखोल मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले.
आजकालची परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की मुलांना सुरक्षित स्पर्श व असुरक्षित स्पर्श यातील फरक समजावून सांगणे अत्यंत गरजेचे आहे. लहान मुलांवरील अत्याचाराची, लैंगिक शोषणाची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक गुन्ह्यांची सुरवात असुरक्षित स्पर्शातून होते. या अनुषंगाने महिला बालकल्याण समितीच्या सदस्या ॲड. नम्रता नेवगी यांनी या शिबिराच्या माध्यमातून सखोल मार्गदर्शन केले. या मार्गदर्शन सत्रात शाळेतील एकूण ७५ विद्यार्थांनी सहभाग घेतला होता. यावेळी कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने प्रकल्प व्यवस्थापक अजिंक्य शिंदे, समुपदेशक समिर शिर्के, महिला मंडळ कुडाळ संस्थेच्या उपाध्यक्षा सुषमा कुळकर्णी, कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन केंद्र कुडाळ च्या वतीने ॲड. नेवगी, समुपदेशक करिष्मा परब, महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या वतीने समुपदेशक प्रियांका बाक्रे यांनी या शिबिरात मार्गदर्शन केले.
प्रशालेच्या मुख्याध्यापक श्री. गोसावी, शिक्षिका श्रीमती सावंत यांचे सहकार्य लाभले. शालेय विद्यार्थ्यांना यावेळी कोकण संस्थेच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले.

You cannot copy content of this page