सामाजिक कार्यकर्त्या निलिमा चलवाडी यांचा स्तुत्य उपक्रम : आज सायंकाळी भटवाडी धनश्री मंगल कार्यालयात होणार कार्यक्रम
⚡सावंतवाडी ता.१८-: हळदी कुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना”पैठणी” जिंकण्याची सुवर्ण संधी सावंतवाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. निलिमा परशुराम चलवाडी यांनी उपलब्ध करुन दिली आहे.
आज सायंकाळी ४ वाजता भटवाडी येथील धनश्री मंगल कार्यालयात श्री नागेश नेमळेकर यांचा “खेळ पैठणीचा” हा कार्यक्रम होणार आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थितीत दर्शवावी आणि पैठणी जिंकण्याची सुवर्ण संधी प्राप्त करावी असे आवाहन सौ. चलवाडी यांनी केली आहे.
