⚡वेंगुर्ला ता.१८-: सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनची वरिष्ठ (पुरुष व महिला) गट जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा दि. २१ व २२ जानेवारी २०२३ रोजी मुख्य प्रशासकीय इमारत, वेंगुर्ला नगरपरिषद येथे होणार आहे.
प्रवेश शुल्क रु. ५०/- व नोंदणी शुल्क रु. ५० असे एकूण रु. १००/- सह आपली नावे खालील ठिकाणी १८ जानेवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत द्यावीत. खेळाडूंना पांढरा टी शर्ट व फूल पॅन्ट, ट्रॅक पॅन्ट घालून सामने खेळणे बंधनकारक राहील. या स्पर्धेसाठी राष्ट्रीय कॅरम पंच अमेय पेडणेकर यांना स्पर्धेचे प्रमुख पंच नियुक्त केले आहे. नावनोंदणीसाठी राजेश निर्गुण ( ७५१७५३५०२८), शुक्राचार्य म्हाडेश्वर (८८५५०६०८०६), पांडुरंग पाताडे ( ८६२५०७४१०६), प्रकाश प्रभू (९४२३३०३८२२) यांच्याकडे संफ साधावा. या स्पर्धेमधे जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.अवधूत भणगे व वेंगुर्ला कॅरम असोसिएशनचे अब्दुल शेख यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशनचे सचिव योगेश फणसळकर (७६२०७५५७६६) यांच्याशी संफ करावा.
वेंगुर्ल्यात २१ व २२ रोजी कॅरम स्पर्धा
