भाजप महिला मंडळाने जी २० च्या अध्यक्षपद पंतप्रधान मोदी यांची निवड झाल्याबद्दल राबविला विशेष कार्यक्रम

शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी केले मार्गदर्शन

⚡सावंतवाडी ता.१७-: सावंतवाडी शहर भाजप मंडल महिलांच्यावतीने G20 च्या अध्यक्षपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड झाल्याबद्दल विशेष कार्यक्रमाचे भाजप कार्यालय येथे आयोजन करून या निवडीबद्दल भाजप महिलांच्यावतीने आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर यानी G20 संदर्भात मार्गदर्शन केले. २१ महिलांच्या उपस्थिती हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी उत्कर्ष सासोलकर, समृद्धी विरनोडकर, दिपाली भालेकर, मिसबा शेख, सविता टोपले, साक्षी गवस, ज्योती मुद्राळे, साळगावकर, शिंदे, पाटणकर ,माडखोल सरपंच, माजगाव ग्रामपंचायत सदस्य, आदी महिला उपस्थित होते.

You cannot copy content of this page