कोळब गावासाठी स्वतंत्र तलाठी, पोलीस पाटील द्या

सरपंच, उपसरपंच शिष्टमंडळाची मागणी

⚡मालवण ता.१२-: कोळंब गावासाठी कायमस्वरुपी तलाठी, पोलीस पाटील मिळावा, या मागणीसाठी सरपंच सौ. सीया धूरी व उपसरपंच विजय नेमळेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मालवणचे तहसीलदार श्रीपाद पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

कोळंब ग्रा.पं. कार्यक्षेत्रातील तलाठी कार्यालय येथे कार्यरत असणारे तलाठी हे कोळंब, मिर्याबांदा व रेवंडी या गावांसाठी एकच आहेत. त्यामुळे कोळंब ग्रामस्थांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे कोळंबसाठी कायमस्वरुपी स्वतंत्र तलाठी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी या निवेदनात केली आहे.

कोळंब ग्रा.पं. कार्यक्षेत्रातील कोळंब, न्हिवे येथे कार्यरत असणाऱ्या पोलीस पाटील या कांदळगाव येथील रहिवासी असल्याने कोळंब ग्रा.पं. कार्यक्षेत्रातील ग्रामस्थांना वारंवार कांदळगाव येथे जावे लागते. त्यामुळे कोळंब ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. कोळंबसाठी स्वतंत्र कायमस्वरुपी पोलीस पाटील द्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच दूरसंचारच्या मालवण प्रबंधक यांची भेट घेऊन कोळंब ग्रा.पं. कार्यालयात असलेले दूरध्वनी (क्रमांक ०२३६५-२५२७०२ व ०२३६५-२५१२६३) गेले एक ते दीड वर्ष बंद असून कार्यालयीन कामकाजात अडचणी येत आहेत. त्यामुळे हे दूरध्वनी त्वरित कार्यान्वित करावेत, अशी मागणीही करण्यात आली. या शिष्टमंडळामध्ये गजानन पै, निकीता बागवे, नंदा बावकर, स्वप्नील परब आदी सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page