जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी लवकरच स्वतःची वेबसाईट बनवावी

व्यापारी संघ जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर यांचे आवाहन

मालवण दि प्रतिनिधी
महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री. ललित गांधी यांनी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या कणकवली येथे संपन्न झालेल्या ३४ व्या एकता मेळाव्याला संबोधित करतांना महासंघाच्या सदस्यांसाठी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स मार्फत मोफत वेबसाईट बनवून देण्याची घोषणा केली होती. महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या या सुविधेचा लाभ घेऊन सिंधुदुर्गातील काही व्यापारी बांधवांनी आपली वेबसाईट बनवून घेतली आहे.


अद्यापही ज्या व्यापारी बांधवांनी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या या मोफत सुविधेचा लाभ घेतलेला नाही त्या सर्व व्यापारी बांधवांनी सोबत दिलेल्या https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdoUEkk0JStFY4Ii59Z259NEPzjyfmhHXkGxHcN4bMwKa8vyQ/viewform?usp=sf_link या दुव्याचा (लिंक) वापर करून थेट चेंबरकडे वेबसाईट तयार करून देण्याची मागणी करावी.जेणे करून येत्या ३१ जाने. रोजी वेंगुर्ले येथे होणाऱ्या ३५ व्या व्यापारी एकता अशा सर्व वेबसाईटचे औपचारिक प्रकाशन करता येईल. सिंधुदुर्गातील सर्व व्यापारी वर्गाने चेंबरच्या सहकार्याने आपला व्यवसाय डिजिटल करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल अवश्य उचलावे असे आवाहन सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page