⚡मालवण ता.१२-: मालवण तालुक्यातील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाच्या माजी विद्यार्थ्यांची सभा प्रशालेच्या गुरुदक्षिणा सभागृहात कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली असून माजी विदयार्थी संघाच्या अध्यक्षपदी वराडकर हायस्कूलचे माजी विदयार्थी तथा माजी मुख्याध्यापक अनिल फणसेकर यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली आहे
कट्टा येथील वराडकर हायस्कूलचे संस्थापक योगात्मा काकासाहेब वराडकर यांनी १९२६ साली प्रशाला स्थापन केली या घटनेला २०२६ साली १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे आपल्या शाळेचा शतक महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा व्हावा अशी प्रत्येक माजी विद्यार्थ्यांची भावना आहे. यासाठी प्रत्येक माजी विद्यार्थ्यांला संघटित करत भविष्यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेऊन काकासाहेब वराडकर यांचा शिक्षणाचा वारसा घेऊन पुढे वाटचाल करत असलेल्या कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक वाटचालीस मोलाचे सहकार्य करण्याच्या हेतूने माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली आहे. असे मत माजी विद्यार्थी संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनिल फणसेकर यांनी व्यक्त केले.
या माजी विद्यार्थी संघाची उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे उपाध्यक्ष – हेमंत माळकर, जयेंद्रथ परब, सचिव – संजय पेंडूरकर, सहसचिव – भूषण गावडे, खजिनदार – दीपक पेणकर, सहखजिनदार – रविंद्र मोंडकर, सदस्य – गणेश वाईरकर, सुनील गुराम, श्रीकृष्ण गावडे, अमित ढोलम, संजय सावंत, संतोष मयेकर, अर्जुन पेंडूरकर, रविंद्र नाईक, चंद्रशेखर मसुरकर, सागर माळवदे, अनिल चव्हाण, राकेश डगरे, रविंद्र गावडे, हेमंत रावले, संस्था प्रतिनिधी – सुनिल नाईक, आनंद वराडकर तर विशेष निमंत्रित म्हणून संस्था अध्यक्ष अजयराज वराडकर , मुख्याध्यापक संजय नाईक यांची निवड करण्यात आली. शाळेचे माजी विद्यार्थी संजय (पांडू) सावंत यांनी शाळेसाठी पन्नास हजार रुपये देणगी देण्याचे जाहीर केले.
यावेळी माजी विद्यार्थी संघ स्थापन होणे ही काळाची गरज असून शाळेला सर्वार्थाने संपन्न बनविण्यासाठी सर्वांनी एकत्र मिळून काम करूया व शाळेचे नाव अधिक उंचवूया असे मत संस्था अध्यक्ष अजयराज वराडकर यांनी नवनिर्वाचित माजी विद्यार्थी संघाला शुभेच्छा देताना व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय नाईक तर आभार संजय पेंडूरकर यांनी मानले.
