राज्यस्तरीय टेबलटेनिस स्पर्धेत जय गणेश स्कुलच्या मुलींना ब्रॉंझ पदक

⚡मालवण ता.१२-: डेरवन येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत मालवणच्या जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूलच्या १४ वर्षांखालील गटामध्ये कु. आर्या दिघे, कु.प्राची चव्हाण, कु.वर्षा परुळेकर, कु.सावली मोरजकर या मुलींच्या संघाने ब्राॅन्झ पदक पटकाविले.

या विद्यार्थिनींना मालवण टेबल टेनिस अकॅडमीचे विष्णू कोरगांवकर, सुजन परब यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थिनींचे मालवण एज्युकेशन सोसायटी आणि जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूलचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकवर्ग तसेच महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्गचे सचिव हेमंत वालकर यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page