मालवण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन १२ व १३ रोजी

⚡मालवण ता.१०-: मालवण पंचायत समिती शिक्षण विभाग आणि ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी यांच्या संयुक्त विद्यमाने ५० वे मालवण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२२- २३ दि. १२ व १३ जानेवारी रोजी ज्ञानदीप विद्यालय वायंगणी येथे आयोजित करण्यात आले आहे.

या विज्ञान प्रदर्शना उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. १२ रोजी सकाळी १० वा. शासकीय तंत्रनिकेतन मालवणचे प्राचार्या डॉ. सुरेश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्ञानदीप संस्था वायंगणीचे अध्यक्ष सदानंद राणे तसेच गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तरी या विज्ञान प्रदर्शनास उपस्थित राहावे, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी संजय माने व ज्ञानदीप विद्यालयाचे मुख्याध्यापक दगडू टकले यांनी केले आहे.

You cannot copy content of this page