ओझर विद्यामंदिर, कांदळगावचे उद्या स्नेहसंमेलन

⚡मालवण ता.१०-: मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर, कांदळगाव या शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन कार्यक्रम बुधवार दि. ११ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता ओझर विद्या मंदिर कांदळगावच्या सभागृहामध्ये संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी तथा उद्योजक श्री. संजय तारी (संचालक- चेतना फायबर, तळाशील) त्याचप्रमाणे कांदळगावचे सरपंच रणजीत परब, हडी सरपंच प्रकाश तोंडवळकर, रेवंडी सरपंच अमोल वस्त, तळाशील-तोंडवळीच्या सरपंच सौ. नेहा तोंडवळकर, कोळंब सरपंच सौ. सिया धुरी आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमामध्ये पारितोषिक वितरण व विद्यार्थी गुणगौरव समारंभ होणार असून त्यानंतर विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. तरी या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील आजी माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष शेखर अर्जुन राणे, चिटणीस जी. एस. परब, शालेय समितीचे अध्यक्ष किशोर नरे व मुख्याध्यापक पी. आर. खोत यांनी केले आहे.

You cannot copy content of this page