बंद घड्याळ तात्काळ दुरुस्त करावे

माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांची मागणी : अन्यथा घड्याळ झाकून ठेवावे

⚡सावंतवाडी ता.१०-:
येथील शहरातील नगरपरिषदेचे घड्याळ गेले दोन महिन्याच्या कालावधीपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने सदर घड्याळाचे नूतनीकरण करून घड्याळ नागरिकांच्या सेवेत आणावे अशी मागणी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी केली आहे.

दरम्यान सावंतवाडी शहराची ओळख सांगणारे हे घड्याळ आता मात्र थांबलेले आहे. येत्या 26 जानेवारी पर्यंत नूतनीकरण करण्याचे काम न केल्यास मुख्याधिकाऱ्यांनी ते घड्याळ झाकून ठेवण्याचे काम करावे असे सुरेश भोगटे म्हणाले.

You cannot copy content of this page