मडुरा उपसरपंच बाळू गावडे यांची माहिती
⚡बांदा ता.१०-: वाहतुकीस धोकादायक ठरलेल्या मडुरा-सातार्डा रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण तात्काळ करावे अशी मागणी मडुरा उपसरपंच बाळू गावडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली.
दरम्यान, लवकरात लवकर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात येणार असल्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांनी दिल्याचे श्री गावडे यांनी सांगितले.
सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे मडुरा सातार्डा रस्त्याच्या स्थितीबाबत लक्ष वेधण्यात आले.
खड्ड्यात अडकून दुचाकींचा अपघात झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील. त्यामुळे भविष्यात होणारी हानी टाळण्यासाठी तात्काळ सदर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करावे अशी मागणी बाळू गावडे यांनी केली.
