⚡कणकवली ता.१०-: कणकवली तालुका प्रवासी संघ मासिक सभा व जागतिक जिल्हाग्राहक दिन साजरा करणेबाबत विचारविनिमय करणेबाबत नगरवाचनालय कणकवली येथे सभा घेण्यात आली. श्री. पालयेकर याचे अध्यक्षतेखाली सभा झाली. प्रथम कै. रविंद्र मुसळे यांना श्रध्दांजली वहाण्यात आली. कै.रविंद्र मुसळे यांचे अपघाती निधन झालेले तालुका प्रवासी संघ कणकवली सचिवपद रिक्त झाले होते. सदर सचिवपदासाठी तालुका प्रवासी संघाने सदस्य सी.आर चव्हाण यांचे नाव सुचित करण्यात आले. सदर सचिवपदी सी. आर. चव्हाण याची एकमताने बिनाविरोध निवड करणेत आली.
सी. आर. चव्हाण हे विविध क्षेत्रात विविध पदावर कार्यरत आहेत त्याच्या या कार्याची दखल घेऊन सचिवपद देण्यात आले. श्री. चव्हाण सध्या R.T.I चे प्रदेश सचिव आहेत. चर्मकार समाज जिल्हा संघटक म्हणुन कार्यरत आहेत. ग्रामसेवक क्रास्ट्राईब संघटना सल्लागार म्हणुन कार्यरत आहेत तसेच त्यानी भारतीय चर्मकार समाज संघटना जिल्हा सरचिटणीस म्हणुन काम पाहीले आहे. त्यांना समाजभुषण, समाजरत्न, राष्ट्रीय, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय पुरस्कारांने सन्मानिक करणेत आले आहे.
सचिवपदाचा प्रवासी संघासाठी चांगले कामकरुन कै.रविंद्र मुसळे याची निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा प्रमाणिक प्रयत्न करेन असे मत सी. आर. चव्हाण यांनी व्यक्त केले.
