⚡देवगड ता.१०-: येथील उमा मिलिंद पवार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतलेल्या २०२२ च्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता ८ वी) कु.एमा संदीप कुलकर्णी हिने शहरी सर्वसाधारण विभागात जिल्हा गुणवत्ता यादीत ४१ व स्थान प्राप्त करत शिष्यवृत्ती प्राप्त केली.
तर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता ५वी) कु. रोहित लक्ष्मीकांत गोसावी याने जिल्हा गुणवत्ता यादीत ५९ वे स्थान तर कु. दीपिका दयानंद राठौड हिने ४५ वे स्थान प्राप्त करत शिष्यवृत्तीवर आपली मोहोर उमटवली. विद्यार्थ्याच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. आसिफ कादरी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक, विद्यार्थी, पालक यांनी अभिनंदन केले.
फोटो- शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये यश प्राप्त केलेले विदयार्थी शिक्षकांसमवेत छाया वैभव केळकर
