आगामी क्रिकेट स्पर्धेत भंडारी चषक हा निश्चितच ब्रँड ठरेल

रवी तळाशीलकर;मालवणात भंडारी चषक २०२३ चे अनावरण

⚡मालवण ता.०९-: क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांना रेडिमेड चषक, ट्रॉफी दिल्या जातात. मात्र भंडारी चषकाचा वेगळा ब्रँड ठरावा या उद्देशाने या स्पर्धेसाठी जो भंडारी चषक बनविण्यात आला आहे तो स्थानिक पातळीवर लाकडी पद्धतीचा बनविण्यात आला आहे. त्यामुळे हा चषक भंडारी चषकाचा निश्चितच ब्रँड ठरेल. , असे प्रतिपादन सकल भंडारी हितवर्धक संस्थेचे अध्यक्ष रवी तळाशीलकर यांनी येथे बोलताना केले.

सकल भंडारी हितवर्धक संस्थेच्या वतीने टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावर १३ जानेवारीपासून भंडारी चषक २०२३ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेच्या भंडारी चषक चषकाचे अनावरण ज्येष्ठ क्रिकेटपटू देवदत्त उर्फ भाऊ हडकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रवी तळाशीलकर, सुनील नाईक, राजू आंबेरकर, अशोक कांबळी, अजित गवंडे, महेश जावकर, प्रदीप वेंगुर्लेकर, महेश वाईरकर, श्रीकांत वेंगुर्लेकर, दिलीप मांजरेकर, अमित गावकर, गौरव कांबळी, सुशील शेडगे, उमेश मांजरेकर, दीपक धुरी, बाबू साळगावकर, यजुवेंद्र हडकर, अमोल पेडणेकर आदी उपस्थित होते.

श्री. तळाशीलकर म्हणाले, सकल भंडारी हितवर्धक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भंडारी चषक २०२३ क्रिकेट स्पर्धेसाठी जो भंडारी चषक बनविला आहे तो ब्रँड ठरेल असे म्हणाले

संस्थेचे सल्लागार श्री. कांबळी म्हणाले, क्रिकेट स्पर्धेत सोबतच वैयक्तिक स्वरूपाचे ॲथलेटिक खेळांच्या स्पर्धा घ्यायला हव्यात. जेणेकरून आपल्या समाजातील होतकरू मुलांना संधी मिळेल. क्रिकेटमध्ये एखादाच खेळाडू पुढे जातो. परंतु वैयक्तिक क्रीडा प्रकारात प्रत्येकाला संधी असते. त्या दृष्टिकोनातून संस्थेने विविध स्पर्धांचे आयोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

You cannot copy content of this page