सोमलेवाडी प्राथमिक शाळेत विशेष शालेय साहित्य वाटप

देवगड
तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा सोमलेवाडी येथे विद्यार्थ्यांना विशेष शालेय साहित्य वाटप कार्यक्रम पार पडला.
प्रारंभी ईशस्तवन व स्वागतगीतानें सोहळ्यास सुरुवात झाली . कार्यक्रमाचे अध्यक्ष-.संजय सोमले (शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष-सोमलेवाडी) तर प्रमुख पाहुणे म्हणून .सरपंच-.दक्षता दिनेश मेस्री , ग्रामपंचायत सद्स्या-.स्मिती बापर्डेकर, उद्योगपती-.मिलिंद सोमले उपस्थित होते. आणि विद्यालयातील . ४७ विद्यार्थीं- विद्यार्थीनींना मोफत शैक्षणिक साहित्य आणि दप्तर ‘ सेवा सहयोग फाउंडेशन-मुंबई ‘ यांचेकडून वितरण करण्यात आले.
गोवळ ग्रामपंचायतकडून शाळेसाठी आलेल्या लॅपटॉप आणि सीपियु आर्पण सोहळा पार पडला.या वेळी ग्रामसेविका सौ फड उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून गोवळ-सोमलेवाडी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करुन एक पारंपारिक आदर्श जपला गेला म्हणून संपूर्ण गोवळ गावातील नेते,ग्रामस्थ, मतदार बन्धु-भगिनीं यांचे मुख्याध्यापक.लक्ष्मण घोटकर यांनी अभिनंदन केले. यावेळी नवनिर्वाचीत बिनविरोध निवडून आलेल्या सरपंच-.दक्षता दिनेश मेस्री, नवनिर्वाचीत .ग्रामपंचायत सद्स्य. दत्तगुरु सोमले, नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सद्स्या-.स्मिती तुषार बापर्डेकर या सर्वांचे अभिनंदन !आणि शाळेच्या वातीने मा.कार्यक्रमाचे अध्यक्ष.संजय सोमले यांच्या हस्ते भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचलन शाळेच्या उपशिक्षिका अनुश्री कुशे यांनी केले तर कार्यक्रमाचा गोड शेवट म्हणजे आभार ! शाळेच्या उपशिक्षिका- कौसर पठाण यांनी केले.

You cannot copy content of this page