मराठी पत्रकार परिषदेच्या राज्यस्तरीय सोहळ्यात सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ आदर्श पुरस्कार वितरण
*💫सावंतवाडी दि.०९-:* आज पत्रकारांसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. या आव्हानांचा सामना करत सत्यमेव जयतेची भूमिका पत्रकारांनी सातत्याने घेण्याची गरज घेत सजग राहिले पाहिजे, असे विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. पालघर जिल्ह्यातील बोर्डी येथे मराठी पत्रकार परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार विरतण सोहळा प्रंसगी ते बोलत होते. मुबंईच्या मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने २०२० वर्षासाठी जाहीर झालेला रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ व वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ राज्यस्तरीय पुरस्कारांचे बोर्डीत वितरण झाले. याप्रसंगी मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस एम. देशमुख, माध्यम तज्ज्ञ समिरण वाळवेकर आदी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.तर बोर्डी पालघर येथे मराठी पत्रकार परिषदेच्या रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाला प्रदान करताना माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले खासदार राजेंद्र कुमार गावित,आमदार श्रीनिवास वंनगा,,सोबत परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, राष्ट्रीय अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे,सरचिटणीस संजीव जोशी, विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, जिल्हाध्यक्ष गणेश जेठे,सचिव उमेश तोरस्कर, उपाध्यक्ष रमेश जोगळे,उज्वल नारकर,सदस्य हरिश्चंद्र पवार,बंटी केनवडेकर,बाळ खडपकर,सुहास देसाई आनंद लोके,नरेंद्र देशपांडे, समीर म्हाडगुत मंगेश तावडे आदी उपस्थित होते उद्घाटन समारंभात बोलताना नाना पटोले यांनी इतिहास नगरीत होत असलेल्या निसर्गसंपन्न बोर्डीनगरातील या समारंभास माझ्या शुभेच्छा असल्याचे म्हटले पत्रकाराच्या पेनाची ताकद काय असते. त्याबद्दल माहिती दिली. सध्या व्यवसाय म्हणून पत्रकारिता झाली आहे. दिल्ली येथे चाललेल्या शेतकरी आंदोलनासंबंधी बोलताना काही वेळा सत्याची बाजू मांडतांना तसेच निर्भीडपणे विचार व्यक्त करणाऱ्या काही पत्रकारांवर गुन्हे दाखल केले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमात एस.एम. देशमुख म्हणाले, या पुरस्कार समारंभासाठी पूर्ण राज्यातून पत्रकार आले आहेत पत्रकारांचा सन्मान झालाच पाहिजे. शाबासकी मिळाली पाहिजे. मराठी साठी मराठी पत्रकार परिषद कार्य करीत आहे. तर समीरण वाळवेकर या कार्यक्रमात प्रकार म्हणजे काय, पत्रकारांनी लेबल लावणे चुकीचे असल्याचे मत मांडले. तर पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित यांनी देखील कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्यातील आठ तालुक्यातील पत्रकारांचा संघांचा सन्मान केला गेला.
