वेताळ प्रतिष्ठान तुळसतर्फे आयोजन_
म💫वेंगुर्ला दि.०९-:* वेताळ प्रतिष्ठान सिधुदुर्ग, तुळस यांच्यातर्फे अश्वमेध अंतर्गत दि.१० ते १४ फेब्रुवारी या कालावधीत श्री देव वेताळ मंदिर तुळसच्या मैदानावर सायंकाळी ७ वाजता दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात दि.१० रोजी खानोलकर दशावतार नाट्य मंडळ खानोली यांचा ‘चौरंगीनाथ‘, दि.११ रोजी सुधीर कलिगण प्रस्तुत कलेश्वर दशावातार नाट्य मंडळ नेरुर यांचा ‘देवदत्त गितांजली‘, दि.१२ रजी नाईक मोचेमाडकर दशावतारी नाट्य मंडळ मोचेमाड यांचा ‘आई कुमारी‘, तर १३ रोजी पार्सेकर दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ला यांचा ‘त्रिनेत्रधारी गणेश‘ आदी नाट्यप्रयोग सादर होणार आहेत. तर दि.१४ रोजी सायं.७ वा. इंद्रधनु कलामंच दाभोली यांची दशावतार कलेवर भाष्य करणारी सामाजिक, विनोदी एकांकिका, निमंत्रित ग्रुपचे विविध नाट्याविष्कार व निमंत्रिक एकपात्री अभिनय, सप्तरंग कलामंच होडावडे यांची धमाल मालवणी एकांकिका ‘गेले भजनाक, पोहचले लग्नाक‘ आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत. यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन वेताळ प्रतिष्ठान, तुळस-सिधुदुर्ग यांनी केले आहे.
