आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारकासाठीचा उर्वरित निधी लवकर उपलब्ध करून द्यावा

*जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांनी पालकमंत्र्यांची भेट घेत दिला प्रस्ताव*

सिंधुदुर्गनगरी ता ०९ सिधुदुर्गनगरी येथे होत असलेल्या बाळशास्त्री जांभेकर स्मारकासाठी आवश्यक असलेला उर्वरित १ कोटी ५० लाखाचा निधी मिळावा. याबाबतचा प्रस्ताव पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे व अन्य पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथील भेटीत सादर केला आहे. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे नावाने सिंधुदुर्गनगरी येथे पत्रकार भवन आणि बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक साकारत आहे ,शासनाने यापूर्वी दिलेल्या ३ कोटी निधीमधून बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन इमारत पूर्णत्वाकडे गेली आहे .राज्य शासनाने ४कोटी ५० लाखाचा निधी मंजूर केला होता. इमारत काम पूर्ण झाले आहे. उर्वरित विद्युतीकरण, फर्निचर, बाळशास्त्री जांभेकर यांचे तैलचित्र आदींसह उर्वरित कामासाठी दीड कोटी निधीची आवश्यकता आहे. गेल्या सिंधुदुर्ग दौऱ्यात पालकमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्गनगरी येथील या पत्रकार भवनाच्या कामाची पाहणी करून पत्रकार भवन कामाबाबत सावजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अभियंत्यांकडून माहिती घेतली होती. यावेळी घेतलेल्या आढाव्यात शासनाने मंजूर करून दिलेल्या साडेचार कोटी निधी मध्ये विद्युती करण व अन्य उर्वरीत कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकामच्या संबंधित अधिकाऱ्यांनी पत्रकार भवनाचे पुढील कामाची निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून घ्यावी .शासन उर्वरित निधी उपलब्ध करून देईल . या व्यतिरिक्त आवश्यकता भासल्यास जादा निधी जिल्हा नियोजन च्या माध्यमातून आपण प्रत्यक्ष उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही दिली होती व दीड कोटी चा लागणाऱ्या निधीचा प्रस्ताव सादर करून उर्वरित निधी लवकरात लवकर उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न करा अशा सूचना दिल्या होत्या .त्यादृष्टीने जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, उपाध्यक्ष बाळ खडपकर , रमेश जोगळे, सचिव उमेश तोरस्कर आदींसह जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी यांनी पालकमंत्री उदय सामंत यांची मंत्रालय मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन उर्वरित दीड कोटी निधी मिळावा याबाबतचा प्रस्ताव सादर केला . मार्च अखेर पत्रकार भवनाचा उर्वरित निधी उपलब्ध करून द्यावा. अशी मागणी त्यानी केली आहे . सिंधुदुर्गनगरी येथे नव्याने साकारत असलेल्या पत्रकार भवनाच्या या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात असून विद्युतीकरण, फर्निचर ,बाळशास्त्री जांभेकर यांच्या तैलचित्र आदींसह कामे पूर्ण होताच राज्यातील पत्रकारांसाठी हे पत्रकार भवन उपलब्ध होणार आहे. राज्यस्तरीय पत्रकार संघाच्या माध्यमातून जिल्हास्तरीय पत्रकार संघाच्या प्रयत्नतून या पत्रकार भवनाच्या कामासाठी निधी उपलब्ध व्हावा यादृष्टीने परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक ,किरण नाईक आणि माजी पालकमंत्री दीपक भाई केसरकर यांच्या माध्यमातून केलेले प्रयत्न सार्थकी लागले आहेत. राज्यातील पत्रकारांसाठी हे पत्रकार भवन लवकरच खुले होणार आहे.

You cannot copy content of this page