*💫वेंगुर्ला दि.०९-:* महिलांसाठी खास गोड्या पाण्यातील माशांपासुन विविध खाद्यपदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण वेंगुर्ले येथील साईमंगल कार्यालय येथे शुक्रवार १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १ या वेळेत आयोजित केले आहे. भाजपाचे सिंधु आत्मनिर्भर अभियान व निलक्रांती कृषी व मत्स्यपर्यटन सह.संस्थेच्या वतीने १२ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान सावंतवाडीत जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान येथे मत्स्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या मत्स्य महोत्सवामध्ये गोड्या पाण्यातील माशांची ओळख व्हावी व त्या गोड्या पाण्यातील माशांची चव चाखता यावी, यासाठी महिलांसाठी खास गोड्या पाण्यातील माशांपासुन विविध खाद्यपदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण आयोजित केले आहे. या प्रशिक्षणात मत्स्य महाविद्यालय शिरगाव, रत्नागिरी या मत्स्यविद्यालयाचे डॉ. आशिष मोहिते, डॉ.डाबीर पठाण व प्रोफेसर एस. टी. सारंगधर हे प्रशिक्षण देणार आहेत. या प्रशिक्षण शिबिरामध्ये गोड्या पाण्यातील माशांपासुन कटलेट ,कोळंबी लोणचे, फीश क्रीस्पी व विविध खाद्यपदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण शिबिरात वेंगुर्ले तालुक्यातील महीलांनी सहभागी होऊन आत्मनिर्भर व्हावे, असे आवाहन भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा स्मिता दामले, जिल्हा उपाध्यक्ष अॅड. सुषमा खानोलकर, वृंदा गवंडळकर, महिला शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर यांनी केले आहे.
वेंगुर्ला येथे १२ रोजी गोड्या पाण्यातील माशांपासुन खाद्यपदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण…_
