⚡मालवण ता.२५-: महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक आघाडी द्वारे देण्यात येणारा कोकणरत्न पुरस्कार २०२२ हा मालवण येथील स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्रा.हसन युसूफ खान यांना आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन शरद कृषी भवन, ओरोस या ठिकाणी करण्यात आले होते. शिक्षण क्षेत्राबरोबर सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल प्रा. खान यांचा कोकणरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी विकासभाई सावंत, ऍड.सुहास सावंत, रायगडचे इतिहास अभ्यासक प्रशांत देशमुख, संदेश पारकर आदी मान्यवर उपस्थित होते.
