आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते कळसुलकर येथे विहिरीचे भूमिपूजन

⚡सावंतवाडी ता.२६सहदेव राऊळ-: कोकण विभाग शिक्षक मतदार संघ शिक्षक आमदार श्री बाळाराम पाटील यांच्या हस्ते सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी मधील विहिरीचे भूमिपूजन करण्यात आले.

बाळाराम पाटील हे कोकण विभाग दौऱ्यावर आले असता त्यांनी येथील कळसुलकर प्रशालेस सदिच्छा भेट दिली व शिक्षकांना मार्गदर्शन केले, त्याचबरोबर प्रशालेतील नवीन प्रस्तावित विहिरीचे भूमिपूजन केले. विभागीय शालेय कॅरम स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविलेल्या व राज्यस्तरावर निवड झालेल्या प्रणाली आयरे या विद्यार्थिनीचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री शैलेश पई, उपाध्यक्ष श्री मोहन वाडकर, खजिनदार श्री मुकुंद वझे, सहसचिव श्री गौरांग चिटणीस, श्री काका मांजरेकर, मुख्याध्यापक श्री एन. पी. मानकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page