देवली सरपंच शाम वाक्कर यांचे क्रीडा सहकाऱ्यांकडून अभिनंदन

⚡मालवण ता.२५-: देवली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच म्हणून निवडून आलेल्या शाम वाक्कर यांची क्रीडा क्षेत्रातील सहकारी व क्रिकेट समालोचकांनी भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

देवली सरपंच म्हणून निवडून आलेले शाम वाक्कर हे कला क्रीडा क्षेत्रात वावरत असून ते स्थानिक क्रिकेट मधील मराठी व हिंदी भाषेचे क्रिकेट समालोचक देखील आहेत त्यामुळे क्रीडा क्षेत्रात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. आता सरपंच बनलेल्या वाक्कर यांची त्यांचे क्रीडा सहकारी व समालोचक यांनी भेट घेऊन अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी शाम वाक्कर यांनी सर्वांचे आभार मानत सरपंच पदाला न्याय देऊ आणि गावाशी प्रामाणिक राहून गावाची सेवा करू, अशी ग्वाही दिली.

You cannot copy content of this page