Headlines

सह्याद्री प्रतिष्ठान गड संवर्धनचे कार्य कौतुकास्पद

माजी खासदार निलेश राणे : फुकेरी गडावर शिवरायांचे स्मारक व तोफगाडा लोकार्पण सोहळा

⚡बांदा ता.२५-: छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास हा शौर्याचा आहे. पुढील पिढीला हा इतिहास समजावा यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान गड संवर्धनचे काम हाती घेत आहे हे कौतुकास्पद आहे. हनुमंत गडाच्या विकासासाठी यापुढे राणे कुटुंबीय निश्चितच सहकार्य करतील असा विश्वास माजी खासदार निलेश राणे यांनी फुकेरी हनुमंत गड येथे दिला.
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान व श्री देवी माऊली सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळ फुकेरी यांच्या वतीने गडावर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक व तोफगाडा लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पद्मश्री परशुराम गंगावणे, माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून स्मारकाचा जोर्णोद्धार तसेच तोफगाड्यांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, सावंतवाडीचे माजी नागराध्यक्ष संजू परब, दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, बांदा सरपंच अक्रम खान, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, बाळू सावंत, मकरंद तोरसकर, सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्रमिक गोजमंगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
परशुराम गंगावणे म्हणाले की, गड किल्ले हे आपले वैभव आहे. या गडांचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे. हनुमंत गडाचा इतिहास व महती सर्वदूर पोहोचवीण्यासाठी शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
यावेळी गडावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो शिवप्रेमीची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्यमंत्र्यांचे माजी जनसंपर्क अधिकारी सतीश लळीत यांनी केले.

You cannot copy content of this page