*मत्स्य महोत्सव निमित्त विविध स्पर्धा व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

*सिंधू आत्मनिर्भर अभियानाचे संयोजक अतुल काळसेकर यांची माहिती*

*💫सावंतवाडी दि.०९-:* सिंधू आत्मनिर्भर योजने अंतर्गत सावंतवाडीत शहरात मत्स्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या वेळी विवध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिला मोर्चाच्या वतीने १२ फेब्रुवारी रोजी वेंगुर्ला येथे सकाळी १०:३० ते दुपारी १:३० व सावंतवाडी येथे ३ ते ६ या वेळेत महिलांसाठी प्रशिक्षण शिबिर होणार असून, १३ फेब्रुवारी रोजी महिलांसाठी पाककला स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेमधून अनुक्रमे प्रथम तीन व दोन उत्तेजनार्थ पारितोषिक दिली जाणार असून, अनुक्रमे ३ हजार, २ हजार, १ हजार व ५०० ची दोन अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. तसेच १३ फेब्रुवारी रोजी हॉटेल व्यावसायिकांसाठी गोड्या पाण्यातील माशांचे खाद्य पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच १२ व १३ फेब्रुवारी रोजी निमंत्रित स्पर्धकांची कोळी नृत्य स्पर्धा होणार असून या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकासाठी अनुक्रमे १० हजार, ७ हजार, ३ हजार व उत्तेजनार्थ २ हजार ची दोन पारितोषिके देण्यात येणार आहे. तसेच १४ फेब्रुवारी रोजी मत्स्य शेती प्रशिक्षण शिबिर होणार आहे. तसेच १२ फेब्रुवारी रोजी नवोदित शिल्प कलाकारांसाठी शिल्पकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याबतची माहिती सिंधू आत्मनिर्भर अभियानाचे संयोजक अतुल काळसेकर यांनी दिली आहे. यावेळी रविकिरण तोरसकर, मोहीनी मडगावकर, राजू राऊळ, भाई सावंत, पं.स. सभापती मानसी धुरी, नगरसेविका समृद्धी विर्नोडकर, उत्कर्षा सासोलकर, बंड्या सावंत, आनंद नेवगी आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page