जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची सेनेवर टीका
*💫कणकवली दि.०९-:* केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे तळकोकणात शिवसेनेच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे. शिवसेना खासदार राऊत यांच्या निवडणुकीत प्रचार पोस्टरवर पंतप्रधान मोदी आणि भाजपा नेत्यांची छबी नसती तर राऊत निवडूनही आले नसते. अमित शाह जेथे जातात तो भाग भाजपाचा होतो हा इतिहास आहे. त्यामुळे सेनेचे खासदार बिथरलेत अशी टीका तेली यांनी केली. चिपी विमानतळालगत च्या जमिनीवर पेन्सिल नोंदी बाबत खासदार राऊत यांनी बिनबुडाचे आरोप न करता सेनेचे उद्योगमंत्री देसाइंमार्फत पेन्सिल नोंदीची चौकशी लावावी असे आव्हानही तेली यांनी खासदार राऊत याना दिले
