चिपीवरून १ मार्चला विमान टेक ऑफ घेणार ही खासदार राऊत यांची फसवी घोषणा : राजन तेली

*💫कणकवली दि.०९-:* चिपीवरून १ मार्च ला विमान टेक ऑफ घेणार ही खासदार राऊत यांची फसवी घोषणा आहे. डिजीसीए च्या लायसंस शिवाय विमान उडू शकत नाही. एअरपोर्ट औथोरिटीने दिलेल्या माहितीनुसार अद्याप डिजीसीए चे लायसन्स चिपी एअरपोर्ट ला मिळालेले नाही अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली.

शिवसेना खासदार राऊत यांच्या १ मार्च रोजी चिपीवरून विमानउड्डाण होणार या घोषणेचा समाचार घेताना तेली यांनी अद्याप धावपट्टी च्या त्रुटींची पूर्तता झाली नसल्याचे सांगितले. तूर्तास सिंधुदुर्ग ते मुंबई विमान फेरीची परवानगी मिळाली आहे. अद्यापही एअरपोर्टला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन चे काम सुरू नाही, ऍप्रोच रोड चे काम सुरू नाही याबाबत सत्ताधारी काय करणार असा सवालही तेली यांनी केला.

You cannot copy content of this page