*शहर अध्यक्षा मोहिनी मडगावकर यांची पत्रकार परिषदेत माहिती*
*💫सावंतवाडी दि.०९-:* भाजप महिला मोर्चाच्या वतीने १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ३ ते ६ या वेळेत मत्स्य महोत्सव निमित्त महिलांसाठी गोड्या पाण्यातील माशाचे विविध पदार्थ कसे बनवायचे यासाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले असून, दुसऱ्या दिवशी म्हणजेच १३ फेब्रुवारी रोजी महिलांसाठी पाककला स्पर्धा होणार आहे. या प्रशिक्षण शिबर व पाककला स्पर्धेत महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन महिला शहर अध्यक्षा मोहिनी मडगावकर यांनी केले आहे. यावेळी अतुल काळसेकर, भारतीय युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, पंचायत समिती सभापती मानसी धुरी, नगरसेविका समृध्दी विर्नोडकर्, नगरसेविका उत्कर्षा सासोलकर नगरसेवक आनंद नेवगी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
