शिवसेना संपवण्याची भाषा करणारे आता भाजप संपवतील

जिल्हा बँक अध्यक्ष तथा शिवसेना नेते सतिश सावंत यांचा टोला*

*💫कणकवली दि.०९-:* केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन शिवसेना संपवणार असे वक्तव्य करून २४ तास उलटायच्या आताच जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. आता हा पायगुण कोणाचा आहे. याची खात्री भाजपने नक्की करून घ्यावी. असा टोला जिल्हा बँक अध्यक्ष तथा शिवसेना नेते सतिश सावंत यांनी भाजापवर लगावला आहे. यावेळी ते म्हणाले की, शिवसेना भाजपला असे धक्यावर धक्के आता देतच राहणार आहे. परंतु शिवसेना संपवण्याची भाषा करणारे आता भाजप नक्की संपवतील असा टोला राणेचे नाव न घेता सतिश सावंत यांनी लगावला आहे.

You cannot copy content of this page