*💫कणकवली दि.०९-:* भाजपाकडून सत्तेची फळे चाखून वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर होताच वैभवावाडीत नगरसेवकांनी शिवसेनेत बेडूक उडी मारली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत धूळ खाल्लेल्या स्थानिक शिवसेना नेत्यांची पक्षश्रेष्ठींना खुश करण्यासाठी ही केविलवाणी धडपड असल्याची टीका भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली. एप्रिलमध्ये होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत वैभववाडी नगरपंचायतमध्ये १७ ही नगरसेवक भाजपाचेच असतील असा विश्वास तेली यांनी व्यक्त केला. संतोष पवार हे शिवसेनेतून तर स्वप्नील इस्वलकर आणि रवींद्र रावराणे हे अपक्ष निवडून आले होते. सत्तेसाठी ते भाजपात दाखल झाले. वैभववाडीत १०० मतांचा वॉर्ड आहे. नगरपंचायत चे एकूण मतदार फक्त १ हजार ८०० आहेत. तर कोलगाव सारखी ५ हजार मतांची ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आहे. त्यामुळे मतांतील फरक समजून घ्या. जे नगरसेवक आज शिवसेनेत गेलेत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप शिवसेनेने केले होते. मग असे नगरसेवक आता शिवसेनेला कसे चालतील ? असा सवालही तेली यांनी केला.
एप्रिलमध्ये होणाऱ्या वैभववाडी निवडणुकीत १७ ही नगरसेवक भाजपाचेच : राजन तेली…
